Sandeshkhali : पश्चिम बंगालच्या संदेशखालीत पोलिसांवर जमावाचा हल्ला; 6 पोलीस कर्मचारी जखमी, नऊ आरोपींना अटक
पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील बोयरमारी गावात टीएमसी कार्यकर्त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर शुक्रवारी रात्री जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलीस वाहनाचीही तोडफोड करण्यात आली