Mexico : मेक्सिकोमध्ये 6.5 तीव्रतेचा भूकंप; राष्ट्रपती शिनबाम पत्रकार परिषद सोडून निघाल्या; नुकसान-जीवितहानीचे वृत्त नाही
अमेरिकेतील देश मेक्सिकोमध्ये शुक्रवारी संध्याकाळी (भारतीय वेळेनुसार) 6.5 तीव्रतेचा भूकंप झाला. राजधानी मेक्सिको सिटी आणि नैऋत्येकडील गुएरेरो राज्याच्या काही भागांमध्ये त्याचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप सेवेने याची पुष्टी केली.