India-Bhutan : भारत-भूतानदरम्यान पहिल्यांदाच रेल्वे धावणार; दोन राज्यांना शेजारील देशाशी जोडणार
भारत आणि भूतान दरम्यान पहिल्यांदाच रेल्वे सेवा सुरू होत आहे. यासाठी दोन रेल्वे मार्ग टाकण्याची घोषणा करण्यात आली आहे.परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हे रेल्वे मार्ग आसाममधील कोक्राझार ते भूतानमधील गेलेफू आणि पश्चिम बंगालमधील बनारहाट ते भूतानमधील समत्से पर्यंत टाकले जातील.