यूपीत होळीआधी मशिदी ताडपत्रीने झाकल्या; 10 जिल्ह्यांत शुक्रवारच्या नमाजची वेळ बदलली, संभल-शाहजहांपूरमध्ये हायअलर्ट
यावेळी ६४ वर्षांनंतर रमजानच्या शुक्रवारी होळी आहे. यापूर्वी १९६१ मध्ये, होळी आणि रमजानचा शुक्रवार (जुम्मा) ४ मार्च रोजी एकत्र आला होता. उत्सवात व्यत्यय येऊ नये म्हणून उत्तर प्रदेशातील पोलिस प्रशासन सतर्क आहे. राज्यातील १० जिल्ह्यांत शुक्रवारच्या नमाजच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.