• Download App
    Sambhaji Chhatrapati on Bageshwar Baba 2026 | The Focus India

    Sambhaji Chhatrapati on Bageshwar Baba 2026

    Sambhaji Chhatrapati : धीरेंद्र शास्त्री स्वत:च्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती; छत्रसाल बुंदेला यांचा दाखला देत संभाजी छत्रपती यांची टीका

    बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी छत्रपती यांनी कडक शब्दांत समाचार घेतला असून, छत्रसाल बुंदेला यांचा दाखला देत, “स्वतःच्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती” असे संबोधले आहे. तसेच “अशा भोंदू बाबांना मोठे करणाऱ्या राजकारण्यांना सरळ केले पाहिजे,” अशा कडक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

    Read more