Samay Raina : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश- समय रैनासह 5 इन्फ्लूएन्सर सुनावणीला हजर राहिले नाहीत तर कठोर कारवाई
५ मे रोजी, सर्वोच्च न्यायालयाने इंडियाज गॉट लेटेंटमध्ये एका अपंग मुलाची चेष्टा केल्याच्या प्रकरणाची सुनावणी केली. समय रैनावर त्याच्या शोमध्ये एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या मुलावर आक्षेपार्ह भाष्य केल्याचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने मुंबई पोलिस आयुक्तांना या प्रकरणातील पाचही आरोपींना पुढील सुनावणीत हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत