Samata Patsanstha : समता पतसंस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप; 40 कोटींची मालमत्ता अवघ्या 5 कोटीत परस्पर विकली! सहकार आयुक्तांकडून चौकशीचे आदेश
राज्यातील अग्रगण्य नागरी सहकारी पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेवर झालेल्या गंभीर भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ठेवीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असतानाच, सहकार आयुक्तांनी या पतसंस्थेच्या चौकशीचे आदेश दिल्याने संस्थेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.