Sam Pitroda : सॅम पित्रोदा म्हणाले- पाकिस्तानमध्ये मला घरी असल्यासारखे वाटले; नेपाळ-बांगलादेशही परदेशांसारखे वाटत नाहीत
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी सॅम पित्रोदा यांच्या एका विधानामुळे आणखी एक वाद निर्माण झाला आहे. एका मुलाखतीत पित्रोदा म्हणाले, “मी पाकिस्तानला गेलो होतो आणि मी तुम्हाला सांगतो की, मला तिथे घरी असल्यासारखे वाटले.”