Salvan Momika : कुराण जाळणाऱ्या सलवान मोमिकाची स्वीडनमध्ये हत्या; हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या
स्वीडनमधील मशिदीसमोर कुराण जाळणाऱ्या आंदोलक सलवान मोमिका यांची बुधवारी संध्याकाळी अज्ञातांनी हत्या केली. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, स्टॉकहोममधील सॉडरटेलजे येथील एका अपार्टमेंटमध्ये 38 वर्षीय सलवानवर गोळ्या झाडण्यात आल्या. हत्येच्या वेळी सलवान टिकटॉकवर लाइव्ह होता.