Salman Khan : सलमान खानला दिल्ली हायकोर्टाची नोटीस; चिनी कंपनीने व्यक्तिमत्त्व हक्कांना दिले आव्हान
अभिनेता सलमान खानला दिल्ली उच्च न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. चीनमधील एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित व्हॉइस-जनरेशन प्लॅटफॉर्मने दाखल केलेल्या याचिकेनंतर ही नोटीस पाठवण्यात आली आहे. कंपनीने न्यायालयाच्या त्या अंतरिम आदेशाला आव्हान दिले आहे, ज्यामध्ये सलमान खानच्या व्यक्तिमत्त्व आणि प्रसिद्धी अधिकारांचे संरक्षण करण्यात आले होते.