• Download App
    salary hike | The Focus India

    salary hike

    ST Employees : एसटी कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान, 12500 रुपयांची सण उचलही मिळणार

    राज्यभरातील 85 हजार पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 6 हजार रुपयांची दिवाळी भेट अर्थात सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम 12500 रुपयांची सण उचल देखील मिळणार आहे. इतकेच नव्हे तर वेतन वाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.

    Read more

    Indonesia : इंडोनेशियात खासदारांच्या पगारवाढीविरोधात निदर्शने, संसद जाळली; राष्ट्रपती प्रबोवो यांचा चीन दौरा रद्द

    इंडोनेशियाची राजधानी जकार्ताच्या अनेक भागात खासदारांच्या पगारवाढीविरोधात हिंसक निदर्शने तीव्र झाली आहेत. शुक्रवारी रात्री मकासर शहरातील प्रादेशिक संसदेला निदर्शकांनी आग लावली.

    Read more

    Pay Commission : 1 जानेवारीपासून आठवा वेतन आयोग लागू होणार; कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याची मागणी

    केंद्र सरकार १ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू करणार आहे. दरम्यान, कर्मचारी प्रतिनिधींनी अलीकडेच आयोगाला अनेक महत्त्वाच्या शिफारशी सादर केल्या आहेत. या शिफारशींमध्ये जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करण्याची आणि आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित फायदे वाढवण्याची मागणी समाविष्ट आहे.

    Read more

    Girish Mahajan : महाजन यांची घोषणा; अधिवेशनानंतर शिक्षकांच्या खात्यात 20% वाढीव पगार, आंदोलनाला यश

    शिक्षकांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मोठे यश आले आहे. विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात २० टक्के वाढीव पगार जमा होईल, असे आश्वासन सरकारने दिले आहे. आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनात जाऊन मंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली. शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. चर्चा सकारात्मक झाल्याचे महाजन यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी सकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती.

    Read more