Sajjan Kumar : १९८४च्या शीखविरोधी दंगल प्रकरणात सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा
१९८४च्या शीख विरोधी दंगलीशी संबंधित एका प्रकरणात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने मंगळवारी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हे प्रकरण १ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीतील सरस्वती विहार भागात दोन शीख नागरिक जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांना जिवंत जाळण्याबाबत आहे. या काळात शिखांची कत्तल करण्यात आली आणि त्यांची घरे जाळण्यात आली.