Saifullah Khalid : पाकचा सैफुल्लाह खालिद पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड; PoKमधून करतो ऑपरेटिंग
मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे आणि २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या युनिट, रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.