Saifullah Khalid alias Kasuri : पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्ला खालिद उर्फ कसुरी कोण आहे?
पहलगाम हल्ल्याच्या धक्क्यातून देश अद्याप सावरलेला नाही आणि सैफुल्ला खालिद उर्फ कसुरी हा या हल्ल्याचा सूत्रधार असल्याची बातमी आली आहे. तो लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख आहे. हाफिज सईदचा जवळचा सहकारी कसुरी याने रेझिस्टन्स फ्रंटच्या सहकार्याने हा हल्ला केल्याचे तपास यंत्रणांचे मत आहे.