Saif Ali Khan case : सैफ अली खान प्रकरणात आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याच्या प्रकरणात आजचा दिवस महत्त्वाचा आहे. या प्रकरणातील आरोपी शरीफुल शहजादला वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले आहे. जिथे न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आणि पोलिसांनी आरोपी शरीफुक इस्लामचा चेहरा ओळखण्यासाठी नमुना एफएसएलकडे पाठवला आहे.