Sadhvi Pragya : साध्वी प्रज्ञा सिंह कोर्टात भावुक म्हणाल्या- भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देव शिक्षा देईल; संन्यासी असूनही बदनामी केली
भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देव शिक्षा देईल, अशा शब्दात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना न्यायालयातच रडू कोसळले होते. मी संन्यासी आयुष्य जगले तरी देखील माझी बदनामी केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माझ्या वरून भगव्या रंगाची बदनामी करण्यात आली. मात्र आज त्याच भगव्या रंगाचा विजय झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.