Ambadas Danve : अंबादास दानवे सुरक्षित घर शोधण्याच्या प्रयत्नात, खासदार नरेश म्हस्केंचे वक्तव्य, शिंदे गटाकडून दानवेंना ऑफर
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे सुरक्षित घर शोधण्याच्या प्रयत्नात असल्याचे विधान शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे. तसेच सुरक्षित घर मिळत असेल तर त्यांनी त्या सुरक्षित घरात राहावे, असा सल्ला देखील म्हस्के यांनी दानवे यांना दिला आहे. इतकेच नव्हे तर अंबादास दानवे यांना आम्ही आमंत्रण देतो, ते देखील योग्यच विचार करत आहेत, असे सूचक वक्तव्य देखील म्हस्के यांनी केले आहे.