Sadhvi Pragya ‘मोदी आणि योगींचे नाव घेण्यास भाग पाडले…’ साध्वी प्रज्ञाने केलेल्या आरोपांनी एकच खळबळ!
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आलीये. यासंदर्भातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. यानंतर शनिवारी याच खटल्यातून निर्दोष सुटलेल्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराचा खुलासा केला.