• Download App
    Sadhvi Pragya Singh Thakur | The Focus India

    Sadhvi Pragya Singh Thakur

    मोदी, योगी, मोहन भागवत यांची नावे घेतल्याशिवाय मारहाण थांबवली नाही, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा एटीएसवर गंभीर आरोप

    मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी महाराष्ट्र एटीएसवर गंभीर आरोप करताना खळबळजनक खुलासा केला आहे. “२४ दिवस अमानुष मारहाण झाली.

    Read more

    Jitendra Awhad : हेमंत करकरे यांची हत्या झाली तेव्हाच निकाल लागला; मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

    मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह इतर आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यानंतर 65 किलो आरडीएक्स आले कुठून हा प्रश्न अनुत्तरित आहे. आतंकवादाला जात, धर्म, रंग, पंथ नसतो. तसेच आतंकवादाला धर्माचे नाव चिकटवणे योग्य नाही हे आधीपासून आम्ही सांगत आहोत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

    Read more

    CM Fadnavis : CM फडणवीस मालेगाव निकालावर म्हणाले- UPA चे षडयंत्र उघडे पडले, काँग्रेसने हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी

    विशेष एनआयए कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी दिलेल्या निर्णयामुळे काँग्रेस प्रणित तत्कालीन यूपीए सरकारच्या षडयंत्राचा पर्दाफाश केला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी या निकालावर भाष्य करताना केला. काँग्रेस व यूपीए सरकारने एक षडयंत्र रचून हिंदू व भगवा दहशतवादाचा खोटा प्रचार केला. या प्रकरणी त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाला दहशतवादी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागितली पाहिजे, असे ते म्हणाले.

    Read more

    Sadhvi Pragya Singh Thakur : मालेगाव बॉम्बस्फोट : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरांसह 7 जणांना मृत्युदंडाच्या शिक्षेची NIAची मागणी, 8 मे रोजी सुनावणी

    मालेगाव बॉम्बस्फोट २००८ प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ने भाजपच्या भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांना मृत्युदंडाच्या शिक्षेची एनआयएने मागणी केली आहे. सर्व आरोपींना बेकायदेशीर कृत्य (यूपीए)च्या कलम १६ अंतर्गत मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा युक्तिवाद मुंबईच्या विशेष न्यायालयात एनआयएच्या वतीने केला आहे.

    Read more