Raj Thackeray : वडिलांचे वय मुलापेक्षा कमी कसे? राज ठाकरे यांचा राज्य निवडणूक आयोगाला सवाल; मतदार याद्यांत प्रचंड घोळ असल्याचा आरोप
राज्यातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी मंगळवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. या भेटीवेळी विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध गंभीर त्रुटींवर आवाज उठवला. यावेळी राज ठाकरे यांनी विशेषतः मतदार याद्यांमधील ‘घोळ’ आणि ‘मतदार नोंदणी’ थांबवल्याच्या मुद्द्यावर तीव्र आक्षेप घेत अनेक प्रश्न उपस्थित केले.