Russia : रशिया भारताला अधिक S-400 संरक्षण प्रणाली देणार; रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले- सहकार्य वाढत आहे
रशिया आणि भारत यांच्यात एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी वाढवण्यासाठी चर्चा सुरू आहे. रशियन वृत्तसंस्था टासने एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, रशिया भारताला एस-४०० चा पुरवठा वाढवण्यास तयार आहे.