Russian Soldiers : रशियन सैनिकांना कपडे काढून झाडाला बांधले, तोंडात बर्फ कोंबला, युक्रेनवर हल्ल्याला नकार दिल्याने शिक्षा
युक्रेनविरुद्ध युद्ध लढण्यास नकार देणाऱ्या रशियन सैनिकांना त्यांचेच कमांडर अत्यंत क्रूरपणे शिक्षा करत आहेत. याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये काही सैनिकांना कपडे काढून थंडीत झाडांना बांधलेले दिसत आहे. ते कडाक्याच्या थंडीत थरथरताना दिसत आहेत.