Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?
रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन म्हणाले की, भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या धोरणावर पुनर्विचार करावा. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत राजन म्हणाले की, रशियाकडून तेल खरेदी करून कोणाला फायदा होत आहे आणि कोणाचे नुकसान होत आहे, हे आपण विचारले पाहिजे.