Vladimir Putin : पुतिन म्हणाले- युक्रेनने NATO मध्ये सामील होण्याचा हट्ट सोडावा; तेव्हाच शांतता येईल
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची शुक्रवारी दुपारी वार्षिक ऑनलाइन पत्रकार परिषद सुरू झाली आहे. हा पुतिन यांचा 22वा वार्षिक संवाद आहे. यावेळी ते सामान्य नागरिक आणि माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. तसेच, 2025 मधील सरकारच्या कामकाजावर आणि देशाशी संबंधित मोठ्या मुद्द्यांवर ते आपले मत मांडत आहेत.