Ukraine : युक्रेनचा रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युक्रेनने 95 ड्रोन डागल्याचा रशियाचा आरोप
रशियन माध्यमांनुसार, शनिवारी रात्री उशिरा रशियाच्या कुर्स्क प्रदेशातील अणुऊर्जा प्रकल्पावर युक्रेनने ड्रोन हल्ला केला. युक्रेन आपला ३४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना ही घटना घडली. रशियाने आरोप केला आहे की, या हल्ल्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पात आग लागली.