• Download App
    Rupali Thombre | The Focus India

    Rupali Thombre

    Rupali Thombre : रूपाली ठोंबरे यांचा गंभीर आरोप- रूपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, अशोक खरातच्या विकृतीचा नवा व्हिडिओ

    अशोक खरात प्रकरण रुपाली चाकणकरांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्यावर अनेकांनी टीका करण्यासही सुरुवात केली आहे. त्यात राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा सनसनाटी आरोप ठोंबरे पाटील यांनी केला आहे. तसेच अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना मुख्य आरोपी करा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. याचसोबत रुपाली ठोंबरे यांनी अशोक खरातचा आणखी एक व्हिडिओ शेअर करत टीका केली आहे.

    Read more

    Rohini Khadse : पतीसाठी काळा कोट घालून रोहिणी खडसे कोर्टात, प्रांजल खेवलकरांना महिला आरोपींनी अडकवल्याचा संशय व्यक्त

    रेव्ह पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्या सुटकेसाठी त्यांच्या पत्नी तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे मंगळवारी स्वतः काळा कोट घालून कोर्टात पोहोचल्या. यावेळी त्यांनी प्रांजल यांच्यावतीने युक्तिवाद केला नाही. पण त्या पूर्णवेळ कोर्टात हजर होत्या. दरम्यान, प्रांजल यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी ईशा सिंग नामक तरुणीच्या माध्यमातून प्रांजल खेवलकर यांना या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप केला आहे.

    Read more