Pranjal Khewalkar : प्रांजल खेवलकरांच्या मोबाइलमध्ये 1779 अश्लील फोटो अन् व्हिडिओ; रूपाली चाकणकरांचा दावा
पुण्यात काही दिवसांपूर्वी कथित रेव्ह पार्टीवर धाड टाकत पोलिसांनी कारवाई केली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मानवी तस्करी झाल्याचा गंभीर आरोप चाकणकर यांनी केला आहे.