• Download App
    Rummy Video | The Focus India

    Rummy Video

    Sushma Andhare : सुषमा अंधारे यांचा माणिकराव कोकाटेंना इशारा- आमच्याकडे आणखी व्हिडिओ; सन्मानाने एक्झिट घ्या!

    राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळ कामकाज सुरू असताना रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला असून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर माणिकराव कोकाटे यांनी आज पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले की मला रमी खेळता येत नाही. तसेच राजीनामा देण्यासारखे काय केले? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. इतकेच नव्हे तर माझी बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार असल्याचा देखील त्यांनी इशारा दिला. यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत थेट इशारा दिला आहे.

    Read more