US New Mexico : अमेरिकेत न्यू मेक्सिकोमध्ये पुरामुळे घरे वाहून गेली, टेक्सासमध्ये आतापर्यंत 100 हून अधिक मृत्यू, 161 बेपत्ता
मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर अमेरिकेतील न्यू मेक्सिको राज्यातील अनेक भागांत अचानक पाणी साचले. सर्वात जास्त नुकसान झालेल्या भागात रुईडोसो नावाचे डोंगराळ गाव होते. येथील प्रवाह इतका जोरदार होता की अनेक घरे वाहून गेली आणि अनेक लोक अडकून पडले. मदत आणि बचाव पथके सतत काम करत आहेत.