RSS देशभरात संघ मंडलांच्या विस्तारात तब्बल 67 % वाढ; शताब्दी वर्षात संघविस्तारासह समरस हिंदू समाज निर्मितीचा संकल्प!!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर्षी विजयादशमीला शंभर वर्षे पूर्ण करत आहे. शताब्दी वर्षात संघ कार्याचा विस्तार आणि समाज परिवर्तन यावर भर देण्यात येणार असून अधिक गुणात्मक आणि व्यापक काम करण्याचा संकल्प करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची सांगता (रविवार, २३ मार्च २०२५) झाली.