Ramdas Athawale : मंत्री रामदास आठवलेंचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा; रिपाइंचा ठराव मंजूर
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महाबळेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय विचारमंथन शिबिरात मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत एकमताने हा पाठिंब्याचा ठराव मंजूर करण्यात आला.