Roshni Nadar : रोशनी नाडर आता देशातील सर्वात श्रीमंत महिला; अंबानी-अदानींनंतर तिसऱ्या क्रमांकावर
एचसीएल ग्रुपचे संस्थापक शिव नाडर यांनी अलीकडेच कंपनीतील ४७% हिस्सा त्यांची कन्या रोशनी नाडर मल्होत्रा यांना हस्तांतरित केला आहे. ‘ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स’ नुसार, रोशनी आता 3.13 लाख कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत भारतीय बनल्या आहेत. त्यांच्यापेक्षा जास्त संपत्ती फक्त मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्याकडे आहे.