Ropeway : भारतात बांधला जाणार जगातील सर्वात लांब रोपवे ; दर तासाला २००० लोक प्रवास करू शकणार!
दरवर्षी देशभरातून आणि जगभरातून लाखो लोक हिमाचल प्रदेशात येतात. प्रत्येकजण इथे फिरायला आणि मजा करायला येतो. अशा परिस्थितीत हिमाचलमध्ये वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी, हिमाचलमध्ये जगातील सर्वात लांब रोपवे बांधला जाणार आहे. हिमाचलमधील पर्यटनाला आणखी चालना देण्यासाठी, येथील सरकार शिमला ते परवाणू पर्यंत जगातील सर्वात लांब रोपवे बांधणार आहे.