Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनाही AAIB अहवालावर शंका, म्हणाले – विमान झाडावर आदळले असते तर झाडाचे नुकसान दिसले असते
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी एएआयबीने जाहीर केलेल्या अहवालावर आश्चर्य व्यक्त केले आहे. अजित पवारांचे विमान खाली कोसळण्यापूर्वी झाडाला धडकले असते तर त्या झाडाचे नुकसान दिसले असते, असे त्यांनी म्हटले आहे. या विधानाद्वारे एकप्रकारे त्यांनी या अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.