CM Nitish Kumar : CM नितीश कुमार यांनी महिला डॉक्टरचा हिजाब काढला; आधी विचारले – हे काय आहे; पाटण्यात आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र वाटत होते
पाटण्यात सोमवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आयुष डॉक्टरांना नियुक्ती पत्र देताना एक महिला डॉक्टर नुसरत परवीन यांचा हिजाब स्वतःच्या हाताने काढला. नुसरत यांना मुख्यमंत्र्यांनी आधी नियुक्ती पत्र दिले. त्यानंतर ते तिच्याकडे पाहू लागले. महिलेनेही मुख्यमंत्र्यांकडे पाहून स्मितहास्य केले.