RG Kar rape murder case : आरजी कर बलात्कार-हत्येप्रकरणी आज मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी
कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला इंटर्नवरील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालय आज पुन्हा सुनावणी करणार आहे. न्यायालयाच्या वेबसाइटनुसार, मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांचे खंडपीठ या खटल्याची सुनावणी करेल.