CM Fadnavis : पंतप्रधान म्हणाले उद्यापासून बचत महोत्सव; हे देशातील क्रांतिकारी पाऊल, मुख्यमंत्री फडणवीसांची नवीन जीएसटी धोरणावर प्रतिक्रिया
देशात आता नवीन जीएसटीचे दर उद्यापासून (22 सप्टेंबर) लागू होणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना नवीन जीएसटी धोरणावर भाष्य केले आहे. 22 सप्टेंबर रोजी सूर्योदयासह जीएसटी बचत महोत्सव सुरू होईल. समाजातील सर्व घटकांना याचा फायदा होईल. पंतप्रधानांनी जनतेला फक्त देशवासीयांच्या कठोर परिश्रमातून बनवलेल्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले. यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून हे देशातील क्रांतिकारी पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.