Revenue Minister Bawankule : महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले- रेडी रेकनरची दरवाढ सरसकट नसेल; दरवाढ झाल्याची माहिती निराधार
कोणत्याही भागात रेडिरेकनरमध्ये सरसकट दरवाढ केली जात नाही. जिथे दर वाढविणे आवश्यक आहे तिथेच वाढवला जाईल. गरज नसलेल्या भागात कुठेही दर वाढवला जाणार नाही, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत सांगितले.