Revanth Reddy : पहलगाम हल्ल्यावर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे पंतप्रधान मोदींना उद्देशून मोठे विधान!
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात शुक्रवारी (२५ एप्रिल) हैदराबादमध्ये कँडल मार्च काढण्यात आला, ज्यामध्ये मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद आणि इतर अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी, दहशतवादी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केंद्राला पाठिंबा दिला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना योग्य उत्तर देण्याचे आवाहनही केले.