• Download App
    Republican Sena | The Focus India

    Republican Sena

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे यांना आनंदराज आंबेडकरांची साथ; पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा

    आनंदराज आंबेडकर यांचा रिपब्लिकन सेना पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्ष यांच्या युतीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून या युतीची चर्चा होती. आज एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत आपल्या युतीची अधिकृत घोषणा केली. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येत प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचा हा प्रयत्न असल्याचे या वेळी या दोन्ही नेत्यांनी सांगितले.

    Read more

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय गणित जुळवत मोठा डाव खेळला आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेमध्ये युती होणार असून, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढण्याची तयारी दोन्ही पक्षांनी सुरू केली आहे.

    Read more