Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर सरकारने म्हटले- घाईत निष्कर्ष नको; अंतिम तपास अहवालाची प्रतीक्षा करा
१२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात पायलटच्या चुकीचे वृत्त खोटे असल्याचे नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी म्हटले आहे. नायडू यांनी परदेशी माध्यमांनाही संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी घाईघाईत कोणताही निष्कर्ष काढू नये असा सल्लाही दिला आहे.