Ujjain Mahakal : उज्जैन महाकाल दर्शन घेऊन नुसरत भरुचा वादात; ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष म्हणाले- हा शरियतच्या दृष्टीने गुन्हा, तौबा करा, कलमा वाचा
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा नुकतीच उज्जैन महाकालच्या दर्शनासाठी पोहोचली होती. मंदिरातून अभिनेत्रीचे फोटो समोर आल्यानंतर ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी यांनी याचा तीव्र निषेध करत याला गुन्हा म्हटले आहे.