Supreme Court : खजुराहोच्या वामन मंदिरातील तुटलेली विष्णू मूर्ती बदलण्याची याचिका फेटाळली; CJI म्हणाले- देवालाच काहीतरी करायला सांगा!
खजुराहोच्या जवारी (वामन) मंदिरात भगवान विष्णूची ७ फूट उंच तुटलेली मूर्ती पुनर्संचयित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मंगळवारी सरन्यायाधीश बीआर गवई यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. याचिकाकर्त्याने दावा केला की मुघल आक्रमणादरम्यान ही मूर्ती तुटली होती आणि तेव्हापासून ती याच स्थितीत आहे.