Electoral Bonds : 40 प्रादेशिक पक्षांनी 2532 कोटी कमावले; 70% निवडणूक रोख्यांमधून आले; BRS ने ₹685 कोटी, टीएमसीने ₹646 कोटी कमावले
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने ४० प्रादेशिक पक्षांचा उत्पन्न अहवाल प्रसिद्ध केला आहे. या पक्षांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण २५३२.०९ कोटी रुपये उत्पन्न जाहीर केले आहे. यापैकी ७० टक्क्यांहून अधिक, सुमारे १७९६.०२४ कोटी रुपये निवडणूक रोख्यांमधून आले आहेत.