Trump : ट्रम्प यांचा भारताशी ट्रेड डीलवर चर्चेस नकार; म्हणाले- आधी टॅरिफचा प्रश्न सोडवावा, तेव्हाच बोलू
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत व्यापार करार करण्यास नकार दिला आहे. ट्रम्प म्हणाले की, जोपर्यंत टॅरिफ वाद मिटत नाही तोपर्यंत चर्चा सुरू होणार नाही.यापूर्वी, मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले होते की अमेरिकन अधिकाऱ्यांचे एक पथक या महिन्यात भारतासोबत व्यापार करारावर वाटाघाटी करण्यासाठी भारताला भेट देणार आहे.