Khalistani : खलिस्तानी अतिरेकी पन्नूची धमकी- 15 ऑगस्टला अमेरिकेत खलिस्तान स्वातंत्र्य रॅली काढणार; यानंतर दोन दिवसांनी जनमत चाचणी
खलिस्तानी दहशतवादी नेता गुरपतवंत सिंग पन्नू याने १५ ऑगस्ट रोजी अमेरिकेत खलिस्तान स्वातंत्र्य रॅलीची घोषणा करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासाबाहेर ही रॅली काढण्यात येणार आहे. दोन दिवसांनी येथे खलिस्तानच्या समर्थनार्थ जनमत चाचणी घेण्यात येणार आहे.