Government : सरकारचा महत्त्वाचा निर्णय: राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमध्ये मोठी कपात: पुल-बोगद्यांवर ५०% टोल सवलत
केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दरात मोठी कपात करत नागरिकांना दिलासा दिला आहे. विशेषतः ज्या महामार्गांवर पूल, बोगदे, उड्डाणपूल किंवा उन्नत रस्त्यांचा जास्त वापर आहे, अशा ठिकाणी टोलमध्ये ५०% पर्यंत घट करण्यात आली आहे. यामुळे अशा मार्गांवरून प्रवास करणाऱ्यांचा खर्च लक्षणीयपणे कमी होणार आहे.