Ajit Pawar : अजितदादा म्हणाले- शिंदेंच्या खात्यावर सीएम नाराज नाहीत; 1445 कोटींचा अंबाबाई मंदिर पुनर्विकास प्रकल्प
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील नगरविकास खात्यावर नाराज असल्याचा दावा केला जात आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी हा दावा जोरकसपणे फेटाळून लावला आहे. मुख्यमंत्री नगरविकास खात्यावर नाराज असल्याची माहिती धांदात खोटी आहे, असे ते म्हणाले.