PM Modi : पीएम मोदींचे स्वातंत्र्यदिनाचे सर्वात मोठे भाषण; 103 मिनिटे, त्यांचाच 98 मिनिटांच्या भाषणाचा विक्रम मोडला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ७९व्या स्वातंत्र्यदिनी १०३ मिनिटांचे भाषण दिले. १०० मिनिटांपेक्षा जास्त काळ भाषण देण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून भारताच्या इतिहासात कोणत्याही पंतप्रधानांनी दिलेले हे सर्वात मोठे भाषण आहे.