Brazil : ब्राझील पोलिसांची ड्रग्ज माफियांच्या विरोधात मोहीम; 4 पोलिसांसह 64 जणांचा मृत्यू; माफियांनी ड्रोन वापरून बॉम्ब टाकले
ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथील पोलिसांनी ड्रग्ज माफियांच्या विरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई सुरू केली. रेड कमांड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुख्यात टोळीविरुद्धच्या कारवाईत चार पोलिसांसह किमान ६४ जणांचा मृत्यू झाला.